आंतु बाहेरी सर्वांपासीं – संत निळोबाराय अभंग – ९९४
आंतु बाहेरी सर्वांपासीं ।
परी हा कोणासी नाढळे ॥१॥
मोहियली मायाभ्रमें ।
संसारसंभ्रमें म्हणोनियां ॥२॥
विस्मरणेंचि हा पडे दिठी ।
स्वार्थ् पोटीं विषयाचा ॥३॥
निळा म्हणे गेलीं वांयां ।
ऐसा पावोनियां नरदेह ॥४॥