आशाबध्दाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिकें ॥१॥ श्रवणीं बैसोनियां श्रोता । विटे ऐकुनी त्याची कथा ॥२॥ न करुनियां नमस्कार । अव्हेरिती नारीनर ॥३॥ निळा म्हणे जळो जिणें । सदा त्याचें लाजिरवाणें ॥४॥