संत निळोबाराय अभंग

आशाबध्दा नाहीं मान – संत निळोबाराय अभंग – ९९१

आशाबध्दा नाहीं मान – संत निळोबाराय अभंग – ९९१

आशाबध्दा नाहीं मान ।
बहुत सन्मान नैराश्या ॥१॥
याचिलागीं विचार करा ।
हित तें धरा मानसीं ॥२॥
भजतां देवा देवचि होती ।
विस्मरणें जात अध:पाता ॥३॥
निळा म्हणे ममता बाधी ।
नित्य समाधी नि:संगा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आशाबध्दा नाहीं मान – संत निळोबाराय अभंग – ९९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *