अवघा टाकोनियां धंदा । यारे गोविंदा सांगातें ॥१॥ अवघेचि लाभ येती घरा । तुमच्या एक मोहरा वोळोनि ॥२॥ काय कांडोनियां तें भूस । न लभे लेश कणाचा ॥३॥ निळा म्हणे पुरे उरे । सवे धुरे चालतां ॥४॥