आर्त जीवींचे जाणती । तया भेटती नसवरीत ॥१॥ करितां नामाचे चिंतन । देती वोरसोन निज लाभ ॥२॥ भाव देखोनियां चित्तीं । प्रसन्न होती तात्काळ ॥३॥ निळा म्हणे सर्व जाण । हेंचि ओळखण संतांचे ॥४॥