आर्त जीवींचे जाणती – संत निळोबाराय अभंग – ९८८
आर्त जीवींचे जाणती ।
तया भेटती नसवरीत ॥१॥
करितां नामाचे चिंतन ।
देती वोरसोन निज लाभ ॥२॥
भाव देखोनियां चित्तीं ।
प्रसन्न होती तात्काळ ॥३॥
निळा म्हणे सर्व जाण ।
हेंचि ओळखण संतांचे ॥४॥
आर्त जीवींचे जाणती ।
तया भेटती नसवरीत ॥१॥
करितां नामाचे चिंतन ।
देती वोरसोन निज लाभ ॥२॥
भाव देखोनियां चित्तीं ।
प्रसन्न होती तात्काळ ॥३॥
निळा म्हणे सर्व जाण ।
हेंचि ओळखण संतांचे ॥४॥