आधींच अविश्वासी जन – संत निळोबाराय अभंग – ९८५

आधींच अविश्वासी जन – संत निळोबाराय अभंग – ९८५

आधींच अविश्वासी जन ।
म्हणती कैंचा नारायण ॥१॥
कोण तारिले या काळें ।
लटिकीं बोलती पाल्हाळें ॥२॥
लटिके संत लटिका देव ।
लटिकेंचि पापपुण्य सर्व ॥३॥
निळा म्हणे आमुच्या त्यागें ।
तुम्हांसी निंदिजेल जगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आधींच अविश्वासी जन – संत निळोबाराय अभंग – ९८५