कृपावंत माये । तान्हयाचे झटे साहे ॥१॥ नेदीचि हें रागा हातीं । करी बुझाउनी प्रीती ॥२॥ पुरउनियां आळी । कृपादृष्टी त्या न्याहाळी ॥३॥ निळा म्हणे झणे । दिसेल हें केविलवाणें ॥४॥