ज्याचें करुनियां चिंतन – संत निळोबाराय अभंग – ४४४
ज्याचें करुनियां चिंतन ।
संत चरणी होती लीन ॥१॥
तो हा चंद्रभागे तीरीं ।
ठेउनी हात कटांवरी ॥२॥
उभा राहिला तिष्ठत ।
वाट भक्तांची पहात ॥३॥
निळा म्हणे मुनिजनां ।
ज्याची नित्य उपासना ॥४॥
ज्याचें करुनियां चिंतन ।
संत चरणी होती लीन ॥१॥
तो हा चंद्रभागे तीरीं ।
ठेउनी हात कटांवरी ॥२॥
उभा राहिला तिष्ठत ।
वाट भक्तांची पहात ॥३॥
निळा म्हणे मुनिजनां ।
ज्याची नित्य उपासना ॥४॥