देखिलीं तीं विटेवरी । समान पाऊलें गोजिरीं ॥१॥ माझे राहिलीं मानसीं । सर्वकाळ अहर्निशीं ॥२॥ मुनिजनांचीं मानसें । रंगलीं जेथें सावकाशें ॥३॥ निळा म्हणे योगीजन । ज्यातें बैसले पोटाळून ॥४॥