म्हणती ज्यातें परात्पर । तो हा उभा कटीं कर ॥१॥ रुपें गोजिरा सगुण । अवलोकितां निवे मन ॥२॥ मुगुट कुंडले मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ॥३॥ निळा म्हणे संतभेटी । उतावेळ सदा पोटीं ॥४॥