म्हणती ज्यातें परात्पर – संत निळोबाराय अभंग – ४४२
म्हणती ज्यातें परात्पर ।
तो हा उभा कटीं कर ॥१॥
रुपें गोजिरा सगुण ।
अवलोकितां निवे मन ॥२॥
मुगुट कुंडले मेखळा ।
कांसे मिरवे सोनसळा ॥३॥
निळा म्हणे संतभेटी ।
उतावेळ सदा पोटीं ॥४॥
म्हणती ज्यातें परात्पर ।
तो हा उभा कटीं कर ॥१॥
रुपें गोजिरा सगुण ।
अवलोकितां निवे मन ॥२॥
मुगुट कुंडले मेखळा ।
कांसे मिरवे सोनसळा ॥३॥
निळा म्हणे संतभेटी ।
उतावेळ सदा पोटीं ॥४॥