तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥१॥ वेदराय सनकादिकीं । पोटाळूनियां एकाएकीं ॥२॥ तेंचि मुळींचे भांडवल । नांव पावलें विठ्ठल ॥३॥ निळा म्हणे विटेवरीं । ठेविलें पुंडलिकें तें व्दारीं ॥४॥