तिहीं लोकां जें दुर्लभ – संत निळोबाराय अभंग – ४४१
तिहीं लोकां जें दुर्लभ ।
होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥१॥
वेदराय सनकादिकीं ।
पोटाळूनियां एकाएकीं ॥२॥
तेंचि मुळींचे भांडवल ।
नांव पावलें विठ्ठल ॥३॥
निळा म्हणे विटेवरीं ।
ठेविलें पुंडलिकें तें व्दारीं ॥४॥