गुण वर्णितां भागला शेष । महिमा विशेष नाकळे तो ॥१॥ वेदहि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥ पुराणेंही कुंठित झालीं । अपार खोलीं नेणवे ते ॥३॥ निळा म्हणे तोचि हा येथें । आणिला समथें पुंडलिकें ॥४॥