देखतांचि विठ्ठल मूर्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥१॥ डोळे मुख निवाले कान । देतां आलिंगन हदयें भुजा ॥२॥ पाणी पाद टाळिया नृत्यें । वाणी त्रिसत्य कीर्तनें ॥३॥ निळा म्हणे जीवही धाला । सकळां फावला सुरवाड ॥४॥