गोविलें इंद्रियां । पाय दिठी दावूनियां ॥१॥ ऐसा लाघवी नाटकी । चोर चैतन्य चेटकी ॥२॥ गुणीं गुणांचा वोतला । रुपाकृती उभा ठेला ॥३॥ निळा म्हणे पुंडलीकें । आणिला भुलवावया लोकें ॥४॥