जेणें रचियेलें भूगोळा – संत निळोबाराय अभंग – ४३३
जेणें रचियेलें भूगोळा ।
एकवीस स्वगें लावुनी माळा ॥१॥
तो हा विटे उभा ठेला ।
भक्तें पुंडलिकें पूजिला ॥२॥
ज्याचे चरणींहूनि गंगा ।
उध्दरीत चाले जगा ॥३॥
निळा म्हणे गतिमति ।
माझी आहे ज्याचे हातीं ॥४॥