चौदा भुवनें पोटीं । सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥ तो हा देखियेला डोळां विठो घननीळसांवळा ॥२॥ जों जों दिसे दृश्यकार । तों तों जयाचा विस्तार ॥३॥ निळा म्हणे उत्पन्न होती । जीवे जेथें लता जाती ॥४॥