जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं कंकणे सुशोभितें ॥१॥ पितांबरे घातली कास । हेमरत्नास जिंकियलें ॥२॥ उभा ठेउनी कटावरी हात । दृष्टी न्याहाळित पुंडलिक ॥३॥ निळा म्हणे हरिघनसांवळा । कमळमाळा डोलती ॥४॥