जडित मुद्रिका बाहुभूषणें – संत निळोबाराय अभंग – ४३१
जडित मुद्रिका बाहुभूषणें ।
करीं कंकणे सुशोभितें ॥१॥
पितांबरे घातली कास ।
हेमरत्नास जिंकियलें ॥२॥
उभा ठेउनी कटावरी हात ।
दृष्टी न्याहाळित पुंडलिक ॥३॥
निळा म्हणे हरिघनसांवळा ।
कमळमाळा डोलती ॥४॥