देखतांचि ठसावलें । रुप ह्रदयीं हें चांगलें ॥१॥ विठो लावण्याची कळा । मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥ साळंकार उत्त्म लेणीं । विराजलीं बरवेपणीं ॥३॥ निळा म्हणे तनुमनदिठी । विगुंतली ते वरुनी नुठी ॥४॥