ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषि ॥१॥ तो हा येऊनि इटे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥ नित्य काळ सिध्द मुनी । ज्यातें चिंतनी चिंतिती ॥३॥ निळा म्हणे वैष्णव गाती । ज्यातें वर्णिती वेदशास्त्रें ॥४॥