ज्याची आस करिती – संत निळोबाराय अभंग – ४२९
ज्याची आस करिती लोक ।
देव सकळिक आणि ऋषि ॥१॥
तो हा येऊनि इटे उभा ।
राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥
नित्य काळ सिध्द मुनी ।
ज्यातें चिंतनी चिंतिती ॥३॥
निळा म्हणे वैष्णव गाती ।
ज्यातें वर्णिती वेदशास्त्रें ॥४॥