देखतांचि विटेवरीं । समान पाउलें साजिरीं ॥१॥ माझें लांचावलें मन । नुठी बैसलें वरुन ॥२॥ न सुटे मुंगीयेसी गुळ । जेवीं भ्रमरा आमोद कमळ ॥३॥ निळा म्हणे तैसें झालें । मक्षिकें मोहळें गोविलें ॥४॥