देखतांचि विटेवरीं – संत निळोबाराय अभंग – ४२८
देखतांचि विटेवरीं ।
समान पाउलें साजिरीं ॥१॥
माझें लांचावलें मन ।
नुठी बैसलें वरुन ॥२॥
न सुटे मुंगीयेसी गुळ ।
जेवीं भ्रमरा आमोद कमळ ॥३॥
निळा म्हणे तैसें झालें ।
मक्षिकें मोहळें गोविलें ॥४॥
देखतांचि विटेवरीं ।
समान पाउलें साजिरीं ॥१॥
माझें लांचावलें मन ।
नुठी बैसलें वरुन ॥२॥
न सुटे मुंगीयेसी गुळ ।
जेवीं भ्रमरा आमोद कमळ ॥३॥
निळा म्हणे तैसें झालें ।
मक्षिकें मोहळें गोविलें ॥४॥