गुण लावण्याची खाणी । विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥ जाणे अंतरींचा भाव । देवादिदेव पूजनीय ॥२॥ ब्रम्हादिक लागती पायीं । सुरपती तोहि आज्ञांकित ॥३॥ निळा म्हणे लागला भाग्यें । हातीं अनुरागें गीतीं गातां ॥४॥