दर्शन याचें आदरें घेतां। ओपी सायुज्यता मुक्तीतें ॥१॥ न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदानी ॥२॥ शरणांगताचा आदरीं । वैषम्य अंतरी असेचिना ॥३॥ निळा म्हणे भावचि गांठीं । देखतां साठी करुं धांवे ॥४॥