भेटी गेला पुंडलिका हे सनकादिकां जाणवलें ॥१॥ मग ते धांवोनि आले । उभयतां भेटले देवभक्तां ॥२॥ करुनियां पूजाविधी । लागती पदीं स्वांनंदें ॥३॥ निळा म्हणे मंत्रांजुळी । वोपिती निढळीं दिव्य सुमनें ॥४॥