संत निळोबाराय अभंग

प्रवेश राउळाभीतरीं – संत निळोबाराय अभंग – ४१९

प्रवेश राउळाभीतरीं – संत निळोबाराय अभंग – ४१९

प्रवेश राउळाभीतरीं ।
केला संतमुनीश्रवरीं ॥१॥
तंव तो घननीळ सांवळा ।
उभा विटेवरीं देखिला ॥२॥
कांसे मिरवे पीतांबर ।
विराजित कटीं कर ॥३॥
मुख सुहास्य चांगलें ।
केशर निढळी रेखिलें ॥४॥
अंग प्रत्यंगी भूषणें ।
दिव्यमाळा करकंकणे ॥५॥
निळा म्हणे संतभेटी ।
उता वेळ घली मिठी ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

प्रवेश राउळाभीतरीं – संत निळोबाराय अभंग – ४१९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *