केली कीर्ति अलोलिक – संत निळोबाराय अभंग – ४१७

केली कीर्ति अलोलिक – संत निळोबाराय अभंग – ४१७


केली कीर्ति अलोलिक ।
फुटली हाक त्रैलोक्यीं ॥१॥
दोषी दुराचारी जन ।
केले पावन दर्शनें ॥२॥
नामासाठीं मुक्ती फुका ।
हाही नेटका बडिवार ॥३॥
निळा म्हणे यात्रेसी येती ।
ते ते हाती कृतार्थ ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

केली कीर्ति अलोलिक – संत निळोबाराय अभंग – ४१७