संत निळोबाराय अभंग

बरवी आजी हे जोडी झाली – संत निळोबाराय अभंग – ४१६

बरवी आजी हे जोडी झाली – संत निळोबाराय अभंग – ४१६


बरवी आजी हे जोडी झाली ।
तुमचीं पाउलें देखिलीं ।
अवघींच इंद्रियें निवालीं ।
आलिंगनीं तुमचिया ॥१॥
वदनीं आठवलें नाम ।
तुमचें सांपडलें प्रेम ।
बरवा साधला हा नेम ।
मनही विश्राम पावलें ॥२॥
बरवा पंढरपुरा गेलों ।
सत्सगें महाव्दारा पावलों ।
भीतरीं राउळां प्रवेशलों ।
बारवा भेटलों विठोबासी ॥३॥
तेणें पुरलें सर्वही काम ।
रुप डोळां वदनीं नाम ।
संतांचाही समागम ।
धणी धाय तो पावलों ॥४॥
निळा म्हणे सर्वांपरी ।
कृत्यकृत्य झालों हरी ।
तुमचा दास मी कामारी ।
ठेवा दारवंटा राखोन ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बरवी आजी हे जोडी झाली – संत निळोबाराय अभंग – ४१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *