भकतांलागीं पुढारला – संत निळोबाराय अभंग – ४१५
भकतांलागीं पुढारला ।
येऊनी पुढें उभा ठेला ॥१॥
शीण भागही न विचारी ।
युगानुयुगीं विटेवरी ॥२॥
सोहळा आधिकें अधिक् ।
करीं भक्तांचे कौतुक ॥३॥
निळा म्हणे बहुमानें ।
संतां पूजी वांटी दानें ॥४॥
भकतांलागीं पुढारला ।
येऊनी पुढें उभा ठेला ॥१॥
शीण भागही न विचारी ।
युगानुयुगीं विटेवरी ॥२॥
सोहळा आधिकें अधिक् ।
करीं भक्तांचे कौतुक ॥३॥
निळा म्हणे बहुमानें ।
संतां पूजी वांटी दानें ॥४॥