गाऊनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥ आवडी ते नीच नवीं । वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥ माझे दिठावेल झणे । उतरी वरुनी निंबलोणें ॥३॥ निळा म्हणे आई । परत कृपाळू विठाई ॥४॥