सुकाळ झाला नारीनरां – संत निळोबाराय अभंग – ४१३
सुकाळ झाला नारीनरां ।
चराचरां मुक्तींचा ॥१॥
विठोबाच्या दर्शनमात्रें ।
ऐकतां श्रोतें गुण त्याचे ॥२॥
नित्य नवाचि उत्साह वाटे ।
ह्रदयीं न संडे आनंद तो ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
उपाय बरा योजिला हा ॥४॥