शोषिली पूतना । विषें भरुनी आली स्तनां ॥१॥ तो हा पुंडलिका व्दारीं । उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥ कंस आणि जरासंध । जेणें मर्दिले मागध ॥३॥ निळा म्हणे फरशधारी । केली क्षत्रियां बोहरी ॥४॥