आराधिला पुंडलिकें । जननी पुजुनियां जनकें ॥१॥ त्याच्या भावासी भुलला । भेटी धांवोनियां आला ॥२॥ सहस्त्रसोळा परिवारासीं । वस्ति केली तयापाशीं ॥३॥ निळा म्हणे पाचारिलें । देवसमुदाय आणिले ॥४॥