आराधिला पुंडलिकें – संत निळोबाराय अभंग – ४११
आराधिला पुंडलिकें ।
जननी पुजुनियां जनकें ॥१॥
त्याच्या भावासी भुलला ।
भेटी धांवोनियां आला ॥२॥
सहस्त्रसोळा परिवारासीं ।
वस्ति केली तयापाशीं ॥३॥
निळा म्हणे पाचारिलें ।
देवसमुदाय आणिले ॥४॥
आराधिला पुंडलिकें ।
जननी पुजुनियां जनकें ॥१॥
त्याच्या भावासी भुलला ।
भेटी धांवोनियां आला ॥२॥
सहस्त्रसोळा परिवारासीं ।
वस्ति केली तयापाशीं ॥३॥
निळा म्हणे पाचारिलें ।
देवसमुदाय आणिले ॥४॥