मच्छ कूर्म वराह – संत निळोबाराय अभंग – ४१०

मच्छ कूर्म वराह – संत निळोबाराय अभंग – ४१०

मच्छ कूर्म वराह झाला ।
नृसिंह वामन होऊनि ठेला ॥१॥
तो हा विटे सौम्यरुप ।
कोटी कंदर्पाचा बाप ॥२॥
परशुराम कृतांत काळ ।
अयोध्यावासी नृप गोवळ ॥३॥
निळा म्हणे बौध्य कलंकी ।
होउनी वेगळा नाटकी ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मच्छ कूर्म वराह – संत निळोबाराय अभंग – ४१०