एक जोडी बहुतें खाती । भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥ परि त्या आणिक साहित्यासी । नव्हे तैसी जोडी याची ॥२॥ एकला एकचि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरविलीं ॥३॥ निळा म्हणे न सरे तरी । अदयापिवरी तैसेचि ॥४॥