उपनिषदांच्या मतीं – संत निळोबाराय अभंग – ४०७
उपनिषदांच्या मतीं । ज्याच्या स्तुतिवादें घुमती ॥१॥ तो हा सुंदर नागर । इटे उभा कटींकर ॥२॥ रमा होऊनियां दासी । नित्य सेवीत चरणांसी ॥३॥ निळा म्हणे लीलाचि करी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥४॥