उघडली सतेज खाणी – संत निळोबाराय अभंग – ४०५
उघडली सतेज खाणी ।
लावण्याची बरवेपणीं ॥१॥
विठो सुंदरा सुंदर ।
रुप नागर नागर ॥२॥
मुख अमृतकुपिका ।
पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥
निळा म्हणे कटीतटीं ।
मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥
उघडली सतेज खाणी ।
लावण्याची बरवेपणीं ॥१॥
विठो सुंदरा सुंदर ।
रुप नागर नागर ॥२॥
मुख अमृतकुपिका ।
पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥
निळा म्हणे कटीतटीं ।
मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥