भक्त देखोनियां श्रीहरी । केला घरीं वास पुढें ॥१॥ म्हणे नवजे येथूनियां । युगें गेलियां कल्पकोटी ॥२॥ प्रसन्न झाले निजभक्तासी । म्हणती मुक्तीसी वांटीन येथें ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । राहिले तिष्ठत मग उभे ॥४॥