संत निळोबाराय अभंग

भक्त देखोनियां श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ४०४

भक्त देखोनियां श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ४०४


भक्त देखोनियां श्रीहरी ।
केला घरीं वास पुढें ॥१॥
म्हणे नवजे येथूनियां ।
युगें गेलियां कल्पकोटी ॥२॥
प्रसन्न झाले निजभक्तासी ।
म्हणती मुक्तीसी वांटीन येथें ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
राहिले तिष्ठत मग उभे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त देखोनियां श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ४०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *