ओंवाळिती विठोबासी । नित्यानित्य परमादरेसि ॥१॥ नवनिताचीं विलेपनें । पंचामृतें अभिषचनें ॥२॥ नाना उपभोग अर्पिती । नैवेदय माळा पुष्पयाती ॥३॥ निळा म्हणे नामघोषें । करिती आनंद उल्हासें ॥४॥