महर्षि सिध्द सनकादिक । संत ज्याचे उपासक ॥१॥ तो हा पुंडलिका भेटी । आला उतावेळ पोटीं ॥२॥ शिवाचिये ध्यानीं मनीं । योगी चिंचिती चिंतनी ॥३॥ निळा म्हणे रमा दासी । म्हणवी सेवूनियां चरणसी ॥४॥