महर्षि सिध्द सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ४००
महर्षि सिध्द सनकादिक ।
संत ज्याचे उपासक ॥१॥
तो हा पुंडलिका भेटी ।
आला उतावेळ पोटीं ॥२॥
शिवाचिये ध्यानीं मनीं ।
योगी चिंचिती चिंतनी ॥३॥
निळा म्हणे रमा दासी ।
म्हणवी सेवूनियां चरणसी ॥४॥
महर्षि सिध्द सनकादिक ।
संत ज्याचे उपासक ॥१॥
तो हा पुंडलिका भेटी ।
आला उतावेळ पोटीं ॥२॥
शिवाचिये ध्यानीं मनीं ।
योगी चिंचिती चिंतनी ॥३॥
निळा म्हणे रमा दासी ।
म्हणवी सेवूनियां चरणसी ॥४॥