वसवूनियां चराचर ।
उभा नागर विटेवरी ॥१॥
सगुण रुपें भासे लोकां ।
परि हा नेटका निरामय ॥२॥
दैत्यांतकचि म्हणती यासी ।
परि हा सकळांसी भक्षक ॥३॥
भक्तांपाशी गुंतला दिसे ।
परि हा वसे अणुरेणीं ॥४॥
कर्ता भोक्ता वाटे सकळां ।
परि हा वेगळा अलिप्त ॥५॥
निळा म्हणे नयेचि मना ।
करितां विवंचना श्रुतिशास्त्रांसिही ॥६॥