वेद शोधितां शिणले – संत निळोबाराय अभंग – ३९७
वेद शोधितां शिणले ।
मग ते मौनचि राहिलें ॥१॥
देखोनि निजात्मा निर्मळा ।
नेणती गोरा कीं सांवळा ॥२॥
हा हस्व दीर्घ नये माना ।
बाळावृध्द किंवा तरुणा ॥३॥
निळा म्हणे तो हा येथें ।
आला भेटों पुंडलिकातें ॥४॥