विठ्ठल केणें मागेंपुढें । पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥ एक ते घेती देती एक । तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥ युगें गेलीं करितां माप । निगमाहि अमूप नये माना ॥३॥ निळा म्हणे भाविकांजोगें । झालें हें अनुरागें आवडीच्या ॥४॥